पॅरिस : FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवला. 2018 मध्ये चॅम्पियन बनलेल्या फ्रान्स संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती, मात्र हा संघ अंतिम फेरी फ्रान्सला पराभव पत्करावा लागला आणि फ्रान्सच्या चाहत्यांना संघाचा हा पराभव पचवता आला नाही.
Riots erupt in #France after the defeat of the national team in the final of the World Cup. pic.twitter.com/HH2efgzyRf
— NEXTA (@nexta_tv) December 18, 2022
अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम लढतीत पराभूत झालेल्या फ्रान्सच्या चाहत्यांना हा पराभव जिव्हारी लागला. त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या पराभवानंतर हजारो चाहते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंसाचार केला. यावेळी संतप्त चाहत्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि फटाक्यांची आतषबाजी करून पोलिसांना त्रास दिला.
#Breaking: Riots broke out in several French cities after the final game of the World Cup.
Attacks against the police and civilians were reported from Paris, Lyon, Nice, Bordeaux and Grenoble.
The video shows a burning barricade from Grenoble. #France #Qatar2022 pic.twitter.com/DQNY175U6t
— The HbK (@The5HbK) December 19, 2022
पॅरिससह अनेक शहरांत चाहत्यांनी आपला संताप व्यक्त करत अनेक वाहने तसेच दुकानांची तोडफोड केली. देशभरात लाखो चाहत्यांनी घातलेल्या या गोंधळावर नियंत्रण राखणे पोलिसांनाही जड जात होते. अखेर पाण्याचे फवारे व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवत पोलिसांनी त्यावर कसेबसे नियंत्रण मिळवले. ज्या कतारमध्ये ही स्पर्धा झाली तेथेही सामना संपल्यावर अशाच काही घटना घडल्या.
बॉलिवूडचा जगभरात डंका! दीपिका पादुकोण बनली फिफा ट्राॅफीचं अनावरण करणारी पहिली अभिनेत्री
फ्रान्समधील हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये फ्रान्सच्या पराभवामुळे संतप्त चाहत्यांचा जमाव हिंसाचार करताना दिसत आहे. पोलिसांनी सर्व भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त चाहत्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.