पिंपरी, दि. 19 – महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तीन दिवसाच्या कालावधीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रतिदिन सरासरी साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पवनाथडीला भेट दिली आहे. गत पवनाथडी जत्रेच्या तुलनेत यावर्षी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून आर्थिक उलाढाल देखील वाढली असल्याची माहिती उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली आहे.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 16 ते 20 या कालावधीत होत असलेल्या पवनाथडी जत्रेत खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पालिकेच्या वतीने सुमारे सातशे पेक्षा अधिक महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले असून या ठिकाणी त्यांच्याद्वारे व्यवसाय करण्यात येत आहेत. स्टॉल्स चे विविध विभागात वर्गीकरण करण्यात आले असून त्यामध्ये शाकाहारी, मांसाहारी आणि इतर वस्तू असे विभाग करण्यात आले आहेत.
महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये खाद्य संस्कृतींचा थाट मांडला आहे. विविध मांसाहारी पदार्थांचा आ आस्वाद घेण्यासाठी लोक मोठ्याप्रमाणात जत्रेला भेट देत आहेत.
स्वाद घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. शाकाहारी खवय्यांना पुरणपोळी, पुरण मांडा, सुकामेवा पासून बनवलेली विविध प्रकारची चिक्की, उकडीचे व विविध प्रकारचे मोदक, छोले मटार करंजी, खोबर करंजी, छोले भटुरे, दिल्ली चाट, गुजराती ढोकळा, फाफडा, दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ, महाराष्ट्रीयन झुणका भाकरी, थालीपिट, मेती धपाटे अशा रुचकर भोजनाचा