रावळपींडी – इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. या ( PAK vs ENG ) सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयाच्या मार्गावर आलेला असताना प्रमुख फलंदाजांनी केलेल्या अपयशी कामगिरीमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला व इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
ICC अंडर-१९ महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ धडाकेबाज फलंदाजाकडे संघाचे नेतृत्व
इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 579 धावा करत दमदार उत्तर दिले होते. त्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव 7 बाद 264 या धावसंख्येवर घोषित केला होता व पाकिस्तानसमोर विजयासाठी 343 धावांचे आव्हान उभे केले होते. या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात दिवसअखेर 2 बाद 80 धावा केल्या होत्या.
ICC अंडर-१९ महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ धडाकेबाज फलंदाजाकडे संघाचे नेतृत्व
सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानचा डाव 268 धावांवर संपला व इंग्लंडने विजय साकार केला. पाकिस्तानकडून सौद शकिलने 76, इमाम उल हकने 48, महंमद रिझवान 46, अझर अली 40 व अघा सलमान 30 यांनी चांगली लढत दिली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन व ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या 9 ते 13 डीसेंबर या कालावधित मुलतानला होणार आहे.
From a record-breaking batting day to start the Test to a riveting thriller on the final day ⚡
The #PAKvENG Test saw several records go for a toss 👀#WTC23https://t.co/2bSrNwiawI
— ICC (@ICC) December 5, 2022