मुंबई – टिकटॉक,इंस्टाग्राम,यु ट्यूब ही सोशल मीडियाची एक वेगळी दुनियाच मानली जाते. ज्याला जास्त फॅन फॉलोविंग त्याची प्रमोशन प्राईझ तेवढीच मोठी असा साधा फॉर्म्युला याठिकाणी चालतो. परंतु यावरून देखील आता फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव पोलिसांनी एका टिकटॉक स्टारला अटक केली आहे. या स्टारवर तब्बल ५० महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवल्याचा आरोप आहे.
देवासी ऊर्फ राजवीर सिंग असं या टिकटॉक स्टारचं नाव असून आपण राजस्थानच्या शाही घराण्यातील असल्याचे सांगून तो महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा त्यानंतर महिलांकडून त्यांचे खाजगी फोटो मागून ब्लॅकमेल करत पैसे उकळायचा. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. देवासी हा यासाठी आपल्या इंस्टाग्रामचा देखील वापर करायचा त्यासोबतच तो टिकटॉक स्टार देखील होता.
तरुणींसह महिलांना फसवण्यासाठी आरोपीने आपले इंस्टाग्राम आणि टिकटॉक चांगलेच सजवले होते. आरोपी मूळचा राजस्थान येथील रहिवासी असल्यामुळे तो आपल्या इन्स्टावर तेथील राजमहाल,चकाकणाऱ्या गाड्या,आलिशान महाल असे शाही फोटो टाकत असे ज्याची भुरळ महिलांनी पडत होती. अशा एक नाही दोन नाही तर तब्बल ५० महिलांची फसवणूक त्याने केली. एका महिलेचे फोटो घेऊन तिला ते फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने ४ लाखांची रक्कम देखील त्याला दिली मात्र अधिकच्या रकमेसाठी तो पुन्हा त्रास देऊन लागल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली.