मुंबई – अभिनेता अल्लू अर्जुन जे करतो ते सगळं भन्नाट असत. म्हणून त्याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच लक्षात राहतात. मग अल्लू अर्जुनचा आर्य चित्रपट असो वा आत्ता आलेला पुष्पा चाहते त्याची प्रत्येक स्टाईल कॉपी करताना दिसतात. चाहत्यांना अल्लूच्या प्रत्येक सिनेमाची अपडेट हवी असते म्हणून ते हवं ते करायला तयार असतात. अशाच काही अल्लू अर्जुन फॅन्सचा एक कारनामा सध्या समोर आला आहे. एकाच दिवशी अल्लूचे फॅन्स रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. फक्त देशातच नाही तर विदेशात देखील ही मोहीम पार पडली.
एखाद्या चित्रपटासाठी आणि त्यातील स्टार्ससाठी चाहत्यांनी रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ असावी. अल्लूचा पुष्पा हा चित्रपट प्रचंड गाजला आता त्याचा दुसरा पार्ट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. परंतु यासंबंधी केवळ बातम्या येताहेत अद्याप अधिकृतपणे सगळी माहिती समोर आली नसल्यामुळे पुष्पाचे फॅन्स काहीसे नाराज झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
After the success of #PushpaTheRise , the cult of restless #AlluArjun fans have taken to the streets asking for an update on the sequel! This rage amongst fans is absolutely fantastic, a phenomena never witnessed before! The fervour and the excitement in their voices was loud.. pic.twitter.com/Ayu1F4piBj
— Ramesh Bala (@rameshlaus) November 15, 2022
हो हे खरं आहे. पुष्पा २ बाबतचे अधिकृत अपडेट मिळावेत यासाठी फॅन्सने रस्त्यावर उतरत हातामध्ये बोर्ड घेऊन आपला संदेश चित्रपटासंबंधी लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये विविध राज्यांतील फॅन्सचा समावेश आहे. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी आपल्या ट्विटरवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कर्नाटक,केरळ आणि महाराष्ट्रातील सोलापूरमधील फॅन्सने रस्त्यावर उतरल्याचे दिसून येते. त्यासोबतच युएईमधील फॅन्सही आपल्या मागणीसाठी हीच कृती केल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हे फक्त साऊथ सिनेमांच्या बाबतीतच घडू शकत असं नेटकऱ्यांचा म्हणण आहे.