एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी तब्बल 20 टक्के विद्यार्थी भारतीय
वॉशिंग्टन : गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये चीन आघाडीवर होता पण आता चीनला बाजूला सारून भारतीय विद्यार्थ्यांनी ही आघाडी घेतली आहे.
अमेरिकेत सध्या जे परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी तब्बल 20% विद्यार्थी हे भारतीय आहेत. अमेरिकेच्या ओपन डोअर्स रिपोर्ट या अहवालात ही माहिती दिली असून गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण 11% वरून वीस टक्के पर्यंत वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जून महिन्यामध्ये म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच अमेरिकेत जाण्यासाठी तब्बल 82 हजार विद्यार्थ्यांना भारतातर्फे व्हिसा देण्यात आला होता. करोना महामारीचा काळ संपल्यानंतर आता अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असून त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण भारतीय विद्यार्थ्यांचेच आहे.
सध्या अमेरिकेत सुमारे तीन लाखाच्या आसपास परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असताना चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र झपाट्याने घट होत आहे.