नवीदिल्ली – T20 विश्वचषक 2022 मध्ये छोटे संघ देखील बलाढ्य टीमसमोर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. याचाच प्रत्येय नुकत्याच झलेल्या आयर्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या मॅचमध्ये आला. आयर्लंडच्या जोशुआ लिटिलने न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेत दमदार बॉलिंगचे प्रदर्शन केले आहे. या T20 विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक आहे.
न्यूझीलंडच्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये जोशुआ लिटिलने हॅटट्रिक घेतली. त्याने केन विल्यमसन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटनरला लागोपाठ तीन चेंडूंवर बाद करत न्यूझीलंडला खिंडार पाडले.जोशुआने या सामन्यात अप्रतिम बॉलिंग केली ज्यात त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 22 धावा देत 3 बळी घेतले.
१९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिटिलने विल्यमसनला प्रथम बाद केले. विल्यमसन डीप स्क्वेअर लेगवर कॅचआऊट झाला. यानंतर लिटलने पहिल्याच चेंडूवर जेम्सला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर मिचेलला ही पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट करत आपली हॅट्रिक पूर्ण केली.
View this post on Instagram
T20 विश्वचषकाच्या इतिहासात फक्त 6 गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे. त्यामध्ये आयर्लंडच्या दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक घेण्यात यश मिळवले आहे. लिटिलपूर्वी, गेल्या वर्षी, कर्टिस कानफरने अबुधाबीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. या T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, यूएईच्या कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक केली आहे.