किव्ह – रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला केला.(Russia Attacks Ukrainian Capital With Waves of Drones) वीज आणि पाणी पुरवठ्याच्या केंद्रांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.
युक्रेनमधील किमान एक तृतीयांश वीज वितरण केंद्रे गेल्या आठवड्यातच बंद पडली आहेत. त्यामुले संपूर्ण देशभर अंधार पसरला आहे, असे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आता कोणतेच कारण उरलेले नाही, असेही झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.
रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माऱ्यामध्ये झायतोमिर या लष्करी तळ असलेल्या शहराचाही वीज आणि पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. हे शहर राजधानी किव्हपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे. जायतोमिर शहरातील वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे तेथील रुग्णालयांना आपत्कालिन वीज पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागले आहे. किव्हमध्येही दोन वीज वितरण केंद्रे क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यात एक ठार झाला असून 6 जण जखमी झाले आहेत.
Kiren Rijiju | न्यायाधीशांची नियुक्ती करणे सरकारचे काम – कायदामंत्री रिजीजू
संरक्षक एस-300 यंत्रणेच्या क्षेपणास्त्रांचाही मारा…
क्षेपणास्त्रांबरोबर रशियाने ड्रोन हल्लेही सुरूच ठेवले आहेत. रशियाच्ये नियंत्रण असलेल्या दक्षिणेकडील झापोरिझ्झियामध्ये ड्रोन हल्ले झाले आहेत. याशिवाय संरक्षक प्रणाली म्हणून वापरल्या जाणाऱ्या एस-300 यंत्रणेच्या क्षेपणास्त्रांचाही मारा रशियाने करायला सुरुवात केली आहे. रशियाकडील क्षेपणास्त्रांची संख्या कमी व्हायला लागल्यामुळे एस-300 चा मारा केला जाऊ लागला आहे.