मुंबई – शाहरुख खान कितीही बीजी असला ताई तो आपल्या कुटुंबाकडे नेहमीच लक्ष देत असतो. आर्यन खान प्रकरणावेळी देखील हे स्पष्ट झालं,कारण आर्यांच्या अटकेची बातमी समोर येताच शाहरुखने आपले शूटिंग बंद करत मुलाकडे धाव घेतली. सोशल मिडीआयवर जेवढी चर्चा शाहरुखची असते तेवढीच चर्चा त्याच्या कुटुंबाची देखील असते. असाच एक आठवण जागृत करणारा शाहरुखचा फोटो सध्या व्हायरल होतोय.
व्हायरल होणार फोटो खूप इंट्रेस्टिंग आहे.यात शाहरुख त्याच्या अबराहम या मुलासोबत उभा असलेला दिसतोय. यावेळी त्याच्या मुलाला तायकांदोमध्ये गोल्ड मेडल मिळाल्याचे दिसून येत आहे. आपल्या मुलाला एखाद्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळणं ही प्रत्येक बापासाठी आनंदाची बाब असते. अशात आपल्या बीजी वेळेतही शाहरुखने त्या ठिकाणी हजेरी लावत मुलाचे कौतुक केले.
View this post on Instagram
यावेळी शाहरुख स्टार बनून नाही तर एक बाप बनून स्टेजवर होता अशावेळी त्याचा साधा अवतार सर्वांनाच भावला. त्याने स्वतः मुलाला मेडल दिल. मुलाच्या विजयचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मरून रंगाचा ती शर्ट आणि कार्गो पॅन्टसह डोक्यावर टोपी अशा सध्या वेशात शाहरुखला पाहण्याचा दुर्मिळ योग्य त्यावेळी जमलेल्या प्रत्येकाने अनुभवला. विशेष म्हणजे शाहरुखला बापाच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी देखील कॅमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या बाप लेकाच्या जोडीचे कौतुक देखील केलंय.