भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा तिसरा टी-२० सामना इंदोर येथे खेळाला गेला. या सामन्यात दमदार फलंदाजी आणि उत्तम गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकन संघाने भारताचा पराभव केला. सामान्यांच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. आफ्रिकन फलंदाजांनी आक्रमक शैलीत जोरदार फटकेबाजी करत भारताला २२७ धावांच बलाढ्य लक्ष्य दिले होते. भारताकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि संघ १७८ धावांवर सर्वबाद झाला. सामना जरी दक्षिण आफ्रिकेने जिंकला असला तरी भारताच्या दीपक चहरने ( Deepak Chahar ) एका कृतीमुळे या सामन्यात सर्वांची मने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. मात्र या दरम्यान दीपक चहरने ( Deepak Chahar ) त्याच्या एका कृतीने सर्व चाहत्यांची मने जिंकली. कारण पहिल्या डावातील १६ व्या षटकात पहिल्या चेंडूवर आफ्रिकेचे रिले रुसो स्ट्राईकवर आणि ट्रिस्टन स्टब्स नॉन स्ट्राईकवर फलंदाजी करत होते. दीपक चहरने ( Deepak Chahar ) चेंडू टाकण्यापूर्वीच स्टब्सने क्रीज सोडले आणि पुढे गेला. यावेळी चहरकडे त्याला मंकडींग पध्द्तीने बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही आणि स्टब्सला सूचना दिली. त्यानंतर स्टब्स क्रीजमध्ये परतला. याच कारणामुळे दीपक चहर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
क्रिकेटच्या इतिहासात मंकडींग पद्धतीने बाद करणे याबाबत अनेक वाद विवाद झाले आहेत. काही जाणकार मंडळी याचे समर्थन करतात तर काही मंडळी या पद्धतीला खेळ भावनेच्या विरुध्द्व समजतात. याअगोदरही अशाप्रकारे खेळाडूला बाद केले गेलेले आहे. आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळणाऱ्या आर अश्विन याने त्याच्या गोलंदाजीवर राजस्थान संघाच्या जोस बटलर याला बाद केले होते. त्यानंतरचे आताचे ताजे उदाहरण म्हणजे, इंग्लंड आणि भारत महिला संघाच्या वनडे सामन्यात भारताच्या दीप्ती शर्माने इंग्लंडच्या चार्ली डीन हिला असेच बाद केले होते. ( India vs South Africa T20I match Deepak Chahar Mankading Effort againts Tristan Stubbs )
Spirit of game at its Best ❤️💛#INDvsSA#Cricket#T20WorldCup pic.twitter.com/QCT6gWB48v
— Muhammad Waqas🇵🇰 (@M_waqas1167) October 5, 2022
मंकडींग पद्धतीने बाद करण्याबाबत याअगोदर आयसीसीने कोणताही नियम बनवला नव्हता. मात्र १ ऑक्टोबर पासून आंतराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमात मंकडींग पद्धतीला धाव बाद ठरवले जाईल असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे आता मंकडींग पद्धतीने एखाद्या फलंदाजाला बाद केल्यास कोणताही वाद होण्याचे कारण नाही.