पुणे, दि. 30 -वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 1) एक दिवस पुणे-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सीएनजी टोरेंट कंपनीचे द्रुतगती महामार्गावारील पंप बंद राहणार आहेत. असे असले तरीही शहरातील पंप सुरू राहणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहन मालकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच, शहर आणि द्रुतगती महामार्गावरील पेट्रोल आणि डीझेलच्या पुरवठ्यावर या बंदचा कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.