औरंगाबाद – सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे शहरासह खेड्यातील रस्त्यांची हालत देखील खराब झालेली आहे. खराब रस्त्यांमुळे अनेकांना हाल सोसावे लागत आहेत. अशाच खराब रस्त्यांना कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमधील ग्रामस्थांनी एक भन्नाट ऑफर देऊ केली आहे. गावात चारचाकी अर्थात फोर व्हीलर आणा आणि ५१ हजार रुपये मिळवा. अशी ही ऑर आहे.
गंगापूरमधील या ऑफरची चर्चा केवळ पंचक्रोशीपुरती नाही तर अवघ्या राज्यात होताना दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावात रस्ताच बांधला गेला नसल्याची खंत मनात ठेऊन गावकऱ्यांनी ही ऑफर दिल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगत आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी दिलेल्या ऑफेराची चर्चा तर सुरु झालीय पण आता गावकऱ्यांच्या प्रश्नाचं समाधान होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सोशल मीडियावर गंगापूर गावातील रस्त्यांचे अनेक फोटो सध्या तुफान व्हायरल होताहेत, त्यासोबतच ५१ हजारांच्या बक्षिसाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होतीय.