मुंबई – अभिनेत्री अक्षरा सिंह आपल्या ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावताना दिसत आहे. भोजपुरी सिनेमाची ड्रीम गर्ल अशी अक्षरा सिंगची ओळख आहे.म्हणूनच तिची गाणी खूपच हिट होतात.अक्षरा सिंग जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच ती एक चांगली गायिका देखील आहे. नुकतंच अक्षरा सिंगने तिच्या दमदार गायनाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अक्षरा सिंग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर अक्षरा सिंगच्या लोकप्रियतेत दुपटीने वाढ झाली आहे. पडद्यावर नाजूक रूपात दिसणारी अक्षरा खऱ्या आयुष्यात तिचा खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहचली आहे.
अक्षरा सिंगचे एक जुने गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल गाण्याचे शीर्षक ‘कोरा में आजा छोरा’ असे ठेवण्यात आले आहे. अक्षरा सिंगने तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणे रिलीज केले आहे. अक्षरा सिंगला तिची बहुतेक गाणी तिच्याच चॅनलवर रिलीज करायला आवडतात, त्यामुळे तिची गाणी ऐकण्यासाठी तिच्या चाहत्यांना कुठेही भटकावं लागत नाही.
अक्षरा सिंगच्या गाण्याचे बोल कुंदन प्रीत यांनी लिहिले आहेत. तर या गाण्याला आशिष वर्मा यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन पंकज सोनी यांनी केले आहे. अक्षरा सिंगचे हे गाणे 7 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. सोशल मीडियावर अक्षराला मिळणार हा प्रतिसाद पाहून तिचे फॅन्स देखील खूप खुश होत आहेत.