मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर पुन्हा एकदा वाढले आहे. बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उर्स निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याच व्हिडीओवरून आता शिवसेनेने फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. ”हेच उद्धव ठाकरेंनी केलं असतं तर भाजपाने अपप्रचार केला असता”, असे त्या म्हणाल्या. सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०० वा वार्षिक उर्स साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, यावरून शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. ”हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर यांनी हिंदुत्व सोडल, असा अपप्रचार केला असता”, असे ट्वीट मनिषा कायंदे यांनी केले आहे.
हेच जर उद्धव साहेबांनी केलं असतं तर यांनी हिंदुत्व सोडल असा अपप्रचार केला असता… pic.twitter.com/OQI18lBu2P
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 26, 2022
सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०० वा वार्षिक उर्स २१ ऑगस्ट ते ३ नोव्हेंबर साजरा होणार आहे. जगभरातून १५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने दोन वर्षानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा शताब्दी वर्ष असल्याने तसेच दोन वर्षांनंतर शाही संदल निघत असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.