मुंबई – रक्षाबंधन चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर अक्षय कुमार आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंग यांच्या आगामी ‘कटपुतली’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये अक्षय कुमार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो सीरियल किलरचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहे.
हा चित्रपट 2 सप्टेंबरला थिएटरऐवजी हॉटस्टारवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अक्षयने चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर शेअर केले आणि चाहत्यांना याबद्दल सांगितले. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा असल्याचे समजते. आता मोशन पोस्टरनंतर अक्षयने चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे.
View this post on Instagram
टीझर रिलीज करताना अक्षयने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, “हा गेम सत्तेचा नाही, तो मनाचा आहे आणि या मनाच्या खेळात तुम्ही आणि मी सगळे कट्पुतली आहोत.छोट्या टीझरमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या पोलिस टीमची ओळख होते. टीझरमध्ये अक्षय ‘माईंड गेम सीरियल किलर्ससोबत खेळला पाहिजे, पॉवर नाही’ असे म्हणताना पाहायला मिळत आहे. या छोट्या टीझरने चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढवली आहे.