मेष : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्याची घाई असेल. योग्य व्यक्तींची साथ मिळाल्याने विक्री व उलाढाल वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत एखाद्या कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलती मिळतील. तुमचा कामाचा वेग व दर्जा उत्तम राहील. घरात कौटुंबिक प्रश्नांवर तोडगा निघेल. कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आप्तेष्ट, नातेवाईक यांची भेट होईल.
वृषभ : दररोजच्या कामात नवचैतन्य निर्माण करणारी घटना घडेल. व्यवसायात जाहिरात व प्रसारमाध्यमांचा उपयोग करून फायद्याचे प्रमाण वाढवता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. नोकरीत कामातील कौशल्याची चुणूक दाखवू शकाल. परदेशगमनाची संधी चालून येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात अंगी असलेले गुण दाखवता येतील. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. एखादे मंगलकार्य ठरेल. कौटुंबिक छोटी सहल काढाल.
मिथुन : नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामात रस घ्याल. स्वत:ची वेगळी प्रतिमा प्रस्थापित कराल. व्यवसायात कृतिशील बनवणारे ग्रहमान आहे. फक्त विचार करण्यापेक्षा कृतीवर भर राहील. मोठ्या व्यक्तींकडून हवे तसे सहकार्य लाभेल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. एखाद्या वेगळ्या कार्यक्रमात मात्र हिरीरीने भाग घ्याल. घरात नवीन जागा वाहन खरेदीचे निर्णय होतील. विवाहोत्सुक मंडळींना जीवनसाथी निवडता येईल.
कर्क : कामाचा झपाटा वाढवणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात कामात तांत्रिक अडथळे जरी आले तरी तुम्ही तुमचे उद्दिष्ट पार पाडाल. पूर्वी तुम्ही ज्यांना मदत केली होती त्यांचे सहकार्य मिळेल. योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी केलेली निवड लाभ घडवून आणले. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत छोटा प्रवास घडेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. तुमचा सल्ला इतरांना मान्य होईल. घरात प्रियजनांसाठी खरेदी होईल.
सिंह : जिद्दीच्या जोरावर तुम्ही यशश्री खेचून आणाल. व्यवसायात मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी पैसे व साधनसामग्रीची तयारी कराल. हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करा नाहीतर पैसे उभे करावे लागतील. नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व येईल. कामासाठी वरिष्ठ आवश्यक त्या सुविधा व जादा अधिकार देतील. घरात वातावरण आनंदी राहील. मुलांकडून अपेक्षित यश कळेल.
कन्या : कामाचे उत्तम नियोजन करून त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याकडे कल राहील. व्यवसायात अपेक्षित व्यक्तींकडून मदत मिळाल्याने अवघड कामात मुसंडी मारू शकाल. कामाच्या मोठ्या योजना आखाल. नोकरीत कामासाठी खास सवलती देतील. सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. घरात संसारिक जीवनातील किरकोळ तणाव वगळता वातावरण आनंदी व उत्साही राहील. खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात मानसन्मान मिळतील.
तुळ : स्वत:च्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. तुमचा कामाचा उत्साह अपूर्व असेल. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. व्यवसायात हवे तेवढे भांडवल हाताशी असल्याने नवीन संकल्प कराल.मात्र, सहकाऱ्यांनाही त्यात सामील करून घ्या. नोकरीत इतरांना न जमणारी कामे पूर्ण कराल. अवघड उद्दिष्ट नजरेसमोर असेल त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. घरात इतर व्यक्तींच्या गरजा पूर्ण कराल.
वृश्चिक : भाग्यकारक ग्रहस्थिती आहे त्याचा लाभ घ्या. व्यवसायात आलेल्या संधीचा वेळीच उपयोग करून घ्या. कामाचा वेग वाढेल. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडी जादा मेहनत कराल. सरकारी कामांकडे व नियमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत जादा अधिकार मिळाल्याने तुमचे पाऊल याकडे पडणार नाही याची दक्षता घ्या.
धनु : प्रगतीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब कराल. कामामुळे थोडा तणाव जाणवेल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन मार्गाचा अवलंब कराल. कामाचे प्रमाण मनाजोगे राहील. त्यामुळे समाधान मिळेल. नोकरीत वरिष्ठ नवे आव्हान तुमच्यापुढे ठेवतील. पण कष्टाची तमा न बाळगता तुम्ही कामात यश मिळवाल व काम वेळेत पूर्ण कराल. घरात खर्चिक बेत ठरतील. तरुणांनी अयोग्य संगत टाळावी. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत.
मकर : ‘यशाच्या वाटा हजार’ याचा प्रत्यय येईल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन कामात यश मिळवाल. पैशाची चणचण दूर करण्यासाठी तात्पुरती कर्जे किंवा हितचिंतकांची मदत घ्यावी लागेल. नोकरीत जादा कामासाठी वरिष्ठ तुमची तोंडदेखणी स्तुती करतील पण सावध राहा. मनाला रुचेल तेच काम करून फायदा मिळवाल. पैशाच्या मोहापायी कुसंगत धरू नका. घरात छोटा समारंभ ठरेल. तरुणांचे विवाह निश्चित होतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.
कुंभ : सभोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवा. व्यवसायात नवीन कामे स्वीकारताना केवळ पैशावर लक्ष ठेवू नका. त्यातील तांत्रिक अडचणी व वेळ याचाही विचार करा. नवीन कामे मिळतील. नोकरीत कोणाचीही चूक न काढता आपले काम वेळेत उरका. वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडा. घरात तुमचे विचार इतरांनी मान्य केलेच पाहिजेत हा अट्टहास नको. रागावर नियंत्रण ठेवावे. तरुणांनी येणाऱ्या संधीचा फायदा उठवावा.
मीन : मनाजोगते काम झाल्याने हायसे वाटेल. स्वच्छंदी जीवन जगण्याचा मोह होईल. व्यवसायात कामाचा व्याप जास्त असेल. योग्य व्यक्तींकडून मदतीचे आश्वासन मिळेल. पैशाची तजवीज होईल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठांना तुमचे म्हणणे मान्य होईल. संसारिक जीवनात सहजीवनाचा आस्वाद घेता येईल. छोटी सहल कुटुंबासमवेत काढाल. तरुणांचे विवाह ठरतील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.