प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 – पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अप्पा बळवंत चौक विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्रावण मासनिमित्त विभागात श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. करोना काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात उत्साहता पूजा झाली.
या सत्कर्म दिवशी अप्पा बळवंत चौक विभागातील विक्रेते बंधू, सेंटरचालक, वृत्तपत्र वितरण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांनी एकत्रित मिळून 20 हजार रुपये तीन-चार वर्ष कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असलेले विक्रेते प्रदीप जगताप यांना उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले.
यावेळी संघनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संजय भोसले, विश्वस्त संदीप शिंदे तसेच संघटनेचे विश्वस्त, विभागप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, सर्व वृत्तपत्र समूहाचे वितरण अधिकारी व विक्रेते बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे महानगर पालिकेतील माजी सभागृह धिरज घाटे व नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली. या कार्यक्रमाचे नियोजन अप्पा बळवंत चौक विभागातील अध्यक्ष चंदन कोऱ्हाळकर, विभागप्रमुख शाम धायगावे, प्रमोद बलकवडे, संघटक गिरीष नगरकर, विभागीय कार्यकारिणी महेश मेथे, महेंद्र मोटे, यशवंत बोगम, पोपटराव गायकवाड, बाळासाहेब ढमाले, विजय जगताप यांनी केले.