माद्रिद : विमानासाठी लागणारे इंधन क्रुड ऑइल पासून तयार केले जाते हे इंधन खूप महागडे असते पण आता स्पेन मधील शास्त्रज्ञांनी एक असा प्रयोग केला आहे की ज्यामुळे हवा आणि पाणी यांच्या माध्यमातून विमानाचे इंधन तयार होणार आहे चीनमधील मोस्टॉल्स येथील काही शास्त्रज्ञांनी सूर्यप्रकाश कार्बन-डाय-ऑक्साईड आणि हवेतील पाण्याचे कण यांच्या सहाय्याने हे इंधन तयार केले आहे या विमानाच्या इंधनाला सोलर केरोसीन असे नाव देण्यात आले.
क्रूड ऑइल पासून तयार होणाऱ्या विमानाच्या इंधनाला हा चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे एवढेच नाही तर हे इंधन पर्यावरण पूरक असणार असून विमानाचे इंधन सध्या जेवढ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करते त्या तुलनेत नवीन इंधनाच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी असणार आहे.
पण सध्याच्या विमानाच्या इंधनाच्या तुलनेत नव्या इंधनाची ऊर्जा किती आहे याचाही विचार करावा लागणार आहे मोठ्या प्रवासासाठी हे इंधन उपयुक्त ठरू शकेल का याचा विचार आता शास्त्रज्ञांना करावा लागणार आहे सध्या विमानासाठी जे जे ट्वेल वापरले जाते त्याची ताकद खूप जास्त असते आणि दीर्घ काळाचा प्रवास हे विमान करू शकते.
पण शास्त्रज्ञांनी हवा आणि पाण्यापासून शोधलेले हे नवीन इंधन तेवढ्या प्रमाणात ताकदवान असू शकेल का याची चाचपणी आता करण्यात येणार आहे स्पेन मधील 170 शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे एक प्रयोग करून नऊ दिवसात हवा आणि पाण्यापासून 5 हजार लिटर इंधन तयार केले आहे पण व्यावसायिक पातळीवर हा प्रयोग कशा प्रकारे यशस्वी होईल याचा विचार आता भविष्यात केला जाणार आहे.