मुंबई – साऊथ स्टार विजय देवरकोंडाचा लायगर चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. लायगरच्या रिलीजची आतुरता सध्या प्रेक्षकांना लागली आहे. विजय आणि अनन्या सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी फिरताहेत. आज पहाटे या दोन्हीही स्टार्सने मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करत चित्रपटाचे प्रमोशन केले. यावेळेसचे दोघांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताहेत.
स्लिपर्सवर दिसला विजय
चित्रपटाच्या ट्रेलर लॉँचवेळी पायात साधी स्लीपर घालून आलेल्या विजयने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. त्यानंतर आता ट्रेनमध्ये देखील विजय स्लीपर घालून आलेला पाहायला मिळाला. फोटोमध्ये, तुम्ही विजय देवरकोंडा लोकल ट्रेनच्या सीटवर लायगर सहकलाकार अनन्या पांडेच्या मांडीवर विश्रांती घेताना दिसून येतोय.
View this post on Instagram
येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी लायगर थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याच अनुषंगाने दोन्हीही स्टार्स मोठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. लोकल प्रवासादरम्यान विजय अनन्याने चांगलीच मस्ती केल्याचे पाहायला मिळते. यावेळी विजयला थेट अनन्याच्या मांडीवर झोपलेला पाहून प्रवाश्यानी देखील आ वासला. या फोटोजवर चाहत्यांनी मात्र तुफान कमेंट करायला सुरुवात केली आहे. विजय आणि अनन्याने यावेळी स्वतः प्लॅटफॉर्मवर जात तिकीट घेऊन ट्रेनमध्ये जाऊन प्रमोशन केल्याने फॅन्सनदी आश्चर्य व्यक्त केलय.