मुंबई – मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. मानसी सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे देखील पाहायला मिळते. सध्या मानसीचा असाच एक अतरंगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आपल्या नृत्याने सर्वांना धक्क करणारी मानसी अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कमी झालेली नाही. आजही सोशल मीडियावर तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडताना दिसतो. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मानसी वेगळ्याच अवतारात दिसली आहे. केसांमध्ये लावलेले स्टायलिश मणी आणि डोळ्याभोवती असणारे रंगबेरंगी कलर यामुळे मानसीचा लूक एकदम खुलून आला आहे.
View this post on Instagram
‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे घराघरात पोहचलेल्या मानसीच्या आगामी चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मानसी सध्या आपल्या पतीसोबत कौटुंबिक वेळ घालवत आहे. मात्र सोशल मीडियावर टाकलेला मानसीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.