वॉशिंग्टन – कोविड-19 ला कारणीभूत असणारा विषाणू रेफ्रिजरेटर किंवा फ्रीझरमध्ये ठेवण्यात आलेले मांस आणि माशांच्या उत्पादनांवर 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे. “अप्लाइड अँड एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी जर्नल”मध्ये नुकतेच प्रकाशित झालेले हे संशोधन चिकन, बीफ, डुकराचे मांस आणि माशांच्या उत्पादनांचा अभ्यास करून सादर करण्यात आले आहे.
संशोधकांनी मांस आणि मासे उत्पादने रेफ्रिजरेशन (4 अंश सेल्सिअस) आणि फ्रीझर तापमान (उणे 20 अंश सेल्सिअस) दोन्ही ठिकाणी साठवले. त्यात गोठवण्यात आलेल्या मासांमध्ये हा विषाणू 30 दिवसांपर्यंत जिवंत राहु शकतो, असे निदर्शनाला आले आहे. सामुदायिक संक्रमणापूर्वी आग्नेय आशियामध्ये कोविडचा उद्रेक होत असल्याचे समजल्यानंतर संशोधकांनी हा अभ्यास केला.
गुजरातमध्ये पुन्हा आढळला कोट्यवधींचा अंमली पदार्थ साठा, मुंद्रा बंदरावर तब्बल…
रेफ्रिजरेशनच्या वातावरणात हे विषाणू टिकू शकतात की नाही याचा शोध घेणे हे आमचे ध्येय होते, असे या विषयी संशोधन करणाऱ्या संशोधकांनी सांगितले. यावर उपाययोजना म्हणून पॅकेजिंगपूर्वी या पदार्थांचे निर्जंतुकीकरण नसणे किंवा अपुरे असणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.