लंडन :- वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पहिल्या एकदिवसीय सामन्याामध्ये इंग्लंडचा संघ अवघ्या 110 धावांत गारद झाला आहे . यावेळी जसप्रती बुमराह याने तब्बल सहा इंग्लंडचे गडी तंबूत धाडत कमाल कामगिरी केली आहे. आता भारताला 50 षटकात 111 धावा करायच्या आहेत.
Innings Break!
6 wickets for @Jaspritbumrah93, 3 for @MdShami11 and a wicket for @prasidh43 as England are all out for 110 in 25.2 overs.
Scorecard – https://t.co/8E3nGmlNOh #ENGvIND pic.twitter.com/w4d7BRMeUg
— BCCI (@BCCI) July 12, 2022
भारताने टाॅस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य ठरवत सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. बुमराहने 7.2 षटकांत 19 धावा देत 6 गडी बाद केले. तर शमीने 3 आणि युवा प्रसिध कृष्णाने एक गडी बाद केला. त्यामुळे इंग्लंडचा संघ 25.2 षटकात 110 धावांवर आटोपला. जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट या पहिल्या तीन फलंदाजांना बुमराहनेच बाद केलं.
इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडच्या जेसन रॉय, ज्यो रुट , बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन या चार फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. इग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या.