मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन पुढील आठवड्यात इराणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. युक्रेनमधील लष्करी कारवाईसाठी इराणकडून रशियाला ड्रोन पुरवले जाण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवण्यात आल्यानंतर लगेचच पुतीन यांच्या इराण दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
मंगळवारपासून पुतीन इराणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी इराण आणि तुर्कीबरोबर पुतीन यांची त्रिपक्षीय चर्चा होणार आहे. सीरिया संबंधित विषयांवर यावेळी चर्चा होणे अपेक्षित आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन या आठवड्यात इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमांबरोबर अमेरिकेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्योगाबाबतही चर्चा होणार आहे. त्यानंतर लगेचच पुतीन यांनी हा दौरा आखला आहे.
जनता दल- भाजपमध्ये पुन्हा तणाव?; कारण…
इराण – तुर्कीबरोबरच्या त्रिपक्षीय चर्चेव्यतिरिक्त पुतीन तुर्कीचे अध्यक्ष रेसिप इर्दोगन यांच्याबरोबरही स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. मार्च महिन्यात इर्दोगन यांनी इस्तंबुलमध्ये रशिया आणि युक्रेनदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्या मध्यस्थीच्या चर्चेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रशियाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात श्रीलंकेला मिळणार नवे अध्यक्ष; हा पर्याय पुढे…