कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सुनिता संजय भालेराव यांच्या दिराने नुकताच एक गावठी कट्टा आणला होता तो गावठी कट्टा सर्वांना दाखवत असताना अचानक त्यातुन गोळी सुटली आणि थेट सुनिता भालेराव यांच्या डोक्यातुन आरपार गेली. काही समजण्याच्या आत सुनिता भालेराव रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेवून गेले माञ त्यांचा त्यत मृत्यु झाला.
या घटनेचे पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिर विशाल भालेराव व त्याचे दोन साथीदार यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान कुठुनतरी एक नविन गावठी कट्टा आणला होता. तोच गावठी कट्टा घरातील सर्वांना दाखवत होता. सर्वजन आश्चर्याने पहात असताना जवळच सुनिता भालेराव या देखील होत्या.
दिर विशाल भालेराव याने सुनिता संजय भालेराव वय ३२ वर्षे यांच्या जवळ जावून अचानक गावठी कट्टयाचा खटका दाबला. त्यातुन वेगाने सुटलेली गोळी सुनिता भालेराव यांच्या डोक्यातुन आरपार गेली. काही समजण्याच्या आत सुनिता भालेराव ह्या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या. घरात एकच पळापळ सुरु झाली. सुनिता भालेराव यांना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. हा सर्व थरार घरातील सर्वांसमक्ष झाल्याची माहीती शिर्डी पोलीसांकडुन सांगण्यात आली.
दरम्यान आरोपी विशाल भालेराव व त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले होते. पोलिसांनी आरोपी शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली होती. शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधिक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे, दळवी यांनी आरोपींचा शोध घेतला असता गोळीबार करणारा मुख्य आरोपीला विशाल भालेराव याला पोलिसांनी बेड्या ठोकुन गजाआड केले . या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करीत आहेत.
गोळी चुकुन लागली की ठरवुन
आरोपीने गावठी कट्टा कुठुन व कुणाला मारण्यासाठी आणला होता की, स्वसंरक्षणासाठी आणला होता. घरातील अनेकजन उपस्थित असताना नेमके भावाच्या बायकोवरच गोळीचा निशाणा का लावला. गोळी चुकुन लागली की, ठरवुन निशाणा साधला. यावरून पोहेगाव पंचक्रोशीतील नागरीक तर्क वितर्क लढवत आहेत.