नवी दिल्ली – डॉलर बळकट होण्याबरोबरच रुपया कमकुवत होत असल्यामुळे जागतिक बाजाराबरोबरच भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात आज सोन्याचा दर 434 रुपयांनी वाढून 50,887 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 918 रुपयांनी वाढून 61,776 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,852 डॉलर व चांदीचा दर 22 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक बाजारात डॉलर बळकट झाला. त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यात घसरण झाली त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला.