मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लिन चिट दिल्यानंतर मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे.
या प्रकरणात त्यांनी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने कारवाईचे संकेत दिले होते. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या डीजी-टीएस म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समीर वानखेडे यांची चेन्नईच्या डीजीटीएस पदी बदली करण्यात आली आहे. हे पद अडगळीचे किंवा साईड पोस्टिंग असल्याचे मानले जाते.