नवी दिल्ली – दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 241 रुपयांनी कमी होऊन 50,671 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 87 रुपयांनी वाढून 61,384 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,848 डॉलर व चांदीचा दर 21.85 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. गेल्या दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या बाजारामध्ये खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत.
जोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध संपुष्टात येत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की अमेरिकेच्या व्याज दरवाढीच्या शक्यतेमुळेही सर्वच बाजारामध्ये अस्थिरता आहे.