मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे.
View this post on Instagram
सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून.
View this post on Instagram
या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. सोनालीचे नुकतेच ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
View this post on Instagram
सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ मेक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे. तिने इंस्टाग्रामवर या ट्रिपमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तिने समुद्रकिनाऱ्यावरील हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकतंच तिने बिकनीतील फोटो शेअर केले आहे.
View this post on Instagram
याआधी सोनाली कुणालसोबत मालदिव आणि दुबईला गेली होती. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.