छत्तीसगडच्या रायपूरमधील सिलतारा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला. या अपघातात तेथे उपस्थित असलेल्या दोन कामगांराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हवा भरताना JCB चा फुटला टायर, दोघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/oRYeESo2er
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 5, 2022
JCBच्या टायरमध्ये हवा भरत असताना टायरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की टायरजवळील दोन्ही कामगार हवेत उडाले. सिलतारा परिसरातील घनकुन स्टील्स प्रा.लि.च्या गॅरेजमध्ये राजपाल सिंग (३२) व प्रंजन सिंग रा. गाव खमहरिया,जिल्हा सतना (मध्य प्रदेश) काम करत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघेही जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायर फुटले व मोठा आवाज झाला. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.