मुंबई – राहुल गांधींचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते एका पबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर भाजपने काँग्रेस नेत्यांना घेरले आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे वक्तव्यही समोर आले असून, राहुल गांधी त्यांच्या नेपाळी मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र या व्हिडिओ वरून भाजप पक्षातील नेत्यांनी राहुल गांधींवर चांगलीच टीका केली. याच टिकेवरून आता शिवसेनेने पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला आहे. ‘नाईट क्लबवर भोंगे!’ या शीर्षकाखाली आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप पक्षातील नेत्यांच्या शिवसेनेनं समाचार घेतला आहे. यावर आता भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिले आहे.
राम कदम यांनी ट्विट केले आहे की,”घालीन लोटांगण, वंदीन चरण! इति पडलो जरी, उताणे आम्ही?” असं म्हणत शिवसेनवर घणाघात केला आहे.
राम कदम यांचे ट्विट
!! घालीन लोटांगण… वंदीन चरण… !!
इति… पडलो जरी.. उताणे आम्ही … ? https://t.co/qjTRfAC9Sy
— Ram Kadam (@ramkadam) May 5, 2022