पुणे – खराडी परिसरात एका उच्चभ्रु इमारतीच्या जवळ रनिंग करत असलेल्या 42 वर्षीय महिलेचा दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडित महिलेने पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमां विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित वर्षीय महिला एक मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरात गेरा इम्पेरियाम अल्फा या इमारती समोर रनिंग करत होती. त्यावेळी त्याठिकाणी दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोन इसमांपैकी गाडीवर मागे बसलेल्या एका इसमाने तिच्या पार्श्वभागावर त्याचे डावे हाताने मारुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यानंतर आरोपी पसार झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती पाहणी केली असून संबंधित परिसरातील सीसीटीवही फुटेजची ही तपासणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस सोनवणे करत आहे.