कोलकाता – भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी सोमवारी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत लग्न केले. गेल्या महिन्यात दोघांची एंगेजमेंट झाली होती. 66 वर्षीय अरुण लाल यांचे हे दुसरे लग्न आहे. कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर दोघांनी मिळून केक कापला आणि दोघेही खूप खुश दिसत होते.
बुलुबल या व्यवसायाने शाळेत शिक्षक आहेत. अरुण लाल यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी दुसरे लग्न केल्याचे सांगितले जात आहे. अरुण आणि बुलबुल हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात.
विशेष म्हणजे, अरुण लाल यांनी भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 729 धावा केल्या. त्यांनी 13 एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यात 122 धावा केल्या. अरुण लाल यांनी 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि शेवटचा सामना 1989 मध्ये खेळला. अरुण लाल यांनी कसोटी किंवा वनडेमध्ये एकही शतक झळकावले नाही. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 6 अर्धशतके केली होती आणि त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 93 धावा होती. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर अरुण लाल यांनी अर्धशतक झळकावले होते आणि त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 51 धावा होती.