मुंबई – भारतासह जगभरातील खेळाडूंसाठी आयडॉल असलेल्या मास्टर ब्लास्टरला केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. क्रिकेटच्या या बादशहाने रविवारी वयाच्या पन्नाशीत पदार्पण केले. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा मेंटॉर असलेल्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मुंबई संघाने एका व्हिडिओद्वारे हॅपी बर्थ डे केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
“He inspired all of 🇮🇳 to watch cricket.” 💙
The boys wish & share their experience of meeting 𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 for the first time on his special day 🥳 pic.twitter.com/JQ9wquIPZW
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीनंतर सचिनने 2013 साली निवृत्ती घेतली. त्यानंतरही त्याने क्रिकेटशीच जोडले राहणार असल्याचे सांगत आयपीएल स्पर्धेतील मुंबई संघाचे मेंटॉर पद सांभाळले. यंदाच्या स्पर्धेत त्याच्या मुंबई संघाला सलग सात पराभव पत्करावे लागले असले तरीही त्याचा सचिनच्या शुभेच्छांवर कोणताही परिणाम झालेला नाही. सचिनला शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या व्हिडिओत, तू आम्हालाच नव्हे तर जगभरातील खेळाडूंना क्रिकेट पाहण्याची व त्यातून घडण्याची प्रेरणा दिलीस. आयुष्याच्या पन्नाशीत पदार्पण केले आहेस आता आयुष्याचे शतकही साकार कर, असा संदेशही देण्यात आला आहे.
The pride of a nation & an emotion to billions. 🙇💙
Paltan, replies मध्ये Sachiiiin Sachiiiin होऊ द्या! Happy birthday, @sachin_rt 🥳🎂#OneFamily pic.twitter.com/xsfjEyhmeu
— Mumbai Indians (@mipaltan) April 23, 2022
सचिनने 2013 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना एकदिवसीय व कसोटी मिळून एकूण 34 हजार 357 धावा करत विक्रम साकार केला आहे. त्यात सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतके फटकावून नवोदित खेळाडूंसमोर विक्रमांचे एव्हरेस्ट प्रस्थापित केले आहे.
Tell us you are die-hard Sachin fans without actually saying it. 😎💙
Wankhede is going to be electrifying tonight & we just can’t wait! 🤩#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #LSGvMI #HappyBirthdaySachin @sachin_rt pic.twitter.com/gSZGE3tCar
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
सचिन निवृत्त झाला असला तरीही त्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही हेच दिसून येते. रविवारी मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यातही सचिन दिसताच प्रेक्षकांनी सचिन, सचिनचा तोच प्रसिद्ध जयघोष सुरू केला व पुन्हा एकदा देशासह जगभरातील तमाम सचिनप्रेमींना भूतकाळाची सफर घडवली.
सचिनने मानले आभार
आपल्या चाहत्यांच्या प्रेमाला तसेच अपेक्षांना सातत्याने शिरसावंध मानत असलेल्या सचिनने या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.
Brought in my birthday with my loved ones! ♥️🎂
Thank you everyone for the warm wishes. pic.twitter.com/R5S916D8dZ
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 24, 2022
खेळासाठी आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करा, यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात कुठेही कमी पडू नका व आपल्या लक्ष्यापासून डळमळीत होऊ नका, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे सचिनने आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे.