पुणे – महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान पृथ्वीराज पाटील यांचा नांदेड सिटीचे संचालक तथा नांदेड सिटी रोटरी क्लबचे अध्यक्ष अतुल कारले यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी अर्चना अतुल कारले यांनी पृथ्वीराज याचे औक्षण केले.
सातारा येथे नुकत्याच कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यात पृथ्वीराज पाटील याने दिमाखदार विजय मिळवला. त्यानंतर त्याच्या निवासस्थानी कारले दाम्पत्य आणि मित्रपरिवाराने भेट देत पृथ्वीराजचा सन्मान केला.
दरम्यान, “पृथ्वीराजने केलेला सराव आणि मेहनत ही तमाम युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पृथ्वीराजला आणखी मोठे मैदान जिंकण्याची संधी आहे. या संधीचे तो सोने करेल,’ असे गौरवोद्गार अतुल कारले यांनी यावेळी काढले. यावेळी उपस्थित मित्रपरिवारानेही पृथ्वीराज याचा गौरव केला.