मुंबई – ‘आश्रम’ वेब सीरिजमध्ये बोल्डनेसचा शिडकावा करणाऱ्या बबिताचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर सद्या व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर त्रिधा चौधरीने बिकिनीतील एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
त्रिधा चौधरी अनेकदा तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच अभिनेत्रीने तिचा असा फोटो शेअर केला आहे की चाहत्यांना फोटोवरून नजर हटवणे कठीण होत आहे. या फोटोमध्ये त्रिधा गोल्डन कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. त्रिधाच्या या बोल्ड पोजने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
View this post on Instagram
‘आश्रम’ची बबिता उर्फ त्रिधा हिने दुबईत हे फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांकडून खूप पसंती दिली जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिचे कौतुक करत आहेत.
त्रिधाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले- ‘माझ्यामध्ये एक देवी आहे.’ फोटो सोबतच अभिनेत्रीचे हे कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आश्रम वेबसीरिजमध्ये त्रिधा चौधरीने बबिताची भूमिका साकारली होती आणि या सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत बरेच रोमँटिक सीन्स दिले होते. त्यानंतर अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती.