अभिनेत्री त्रिधा चौधरीला (Tridha Chaudhary) ‘आश्रम’ या वेबसिरीजमधून अधिक लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता बॉबी देओल वेबसिरीजमधून मुख्य भूमिकेत होता. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यात तिने त्रिधाने बबिता या नावाची भूमिका साकारली होती. मात्र आता पुन्हा त्रिधा चर्चेत आली आहे. त्रिधा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे.
त्रिधा चौधरी पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाची सर्व माहिती सांगितली आहे. मात्र तिने अद्याप तिच्या भावी पतीचं नाव सांगितलेले नाही. लग्नाबाबत त्रिधा मुलाखतीत म्हणाली की, “आम्ही दोघंही सध्या खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आमचं नातं खाजगी ठेवायला आवडतं. मला लग्न साधेपणाने करायचं आहे. सर्व काही ठीक झालं तर पुढच्या वर्षी आम्ही लग्न करू,आमचं लग्न गुरुद्वारात होणार आहे.” विशेष म्हणजे याच इंडस्ट्रीतील मुलाला डेट करत असल्याचा खुलासाही तिने केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) आश्रय (Aashram) या वेब सीरिजमध्ये ‘बबिता’ ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तसेच त्रिधा तिच्या ग्लॅमरस शैलीसाठीही ओळखली जाते. आश्रम (Aashram) या वेब सीरिजद्वारे त्रिधाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. याशिवाय ती लवकरच एका बंगाली सीरीजमध्ये दिसणार आहे. याआधी तिने बंगाली आणि तेलुगु चित्रपटांतही काम केले आहे.