मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला.
आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली असून, त्यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.
नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि दाऊद गँगशी संबंधित व्यक्तिकडे जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती.