मुंबई – आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा ‘राहुल देशपांडे’ गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नाविण्य ते प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. नुकतंच ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
विशेष म्हणजे आजोबांचीच वसंतराव देशपांडे यांची भूमिका स्वतःहा राहुल देशपांडे यांनी साकारली असून प्रेक्षकांसाठी हा दुग्धशर्करा योग आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक होताना दिसून येत आहे. चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील या ‘मी वसंतराव’ या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले आहे.
नाना पाटेकर म्हणाले की.., “या चित्रपटाचे संगीत, गायन, अभिनय आणि दिग्दर्शन अप्रतिम आहेत. सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आहेत. कोणीही अनाठायी नाही. मी तोंडदेखलं बोलत नाही. परंतु हा चित्रपट इतका छान जमला आहे की, मी ६-७ वेळा तो बघू शकतो.
राहुल हा मला मुलासारखा असून त्याने इतका अप्रतिम अभिनय केला आहे की, यंदाचे नॅशनल ॲवॉर्ड त्याला मिळायला हरकत नाही.” अशी प्रतिक्रया नाना पाटेकर यांनी दिली.