पुणे -एम टेनिस अकादमी आयोजित अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत आर्यन कीर्तने, राघव सरोदे, रित्सा कोंडकर, काव्या पांडे या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पुण्याच्या आर्यन कीर्तने याने सर्वज्ञ सरोदेचा 6-1, 6-2 असा पराभव केला.
राघव सरोदे याने तनिष्क देवरेचा 6-3, 2-6, 6-3 असा पराभव केला. मुलींच्या गटात रित्सा कोंडकरने श्रावी देवरेचा 7-6(4), 2-6, 6-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
काव्या पांडे हिने शिबानी गुप्तेचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. दुहेरीत रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांनी सारा फेंगसे व शिबानी गुप्ते या जोडीचा 6-1, 7-6(3) असा, तर कीर्तियानी घाटकरने तमन्ना नायरच्या साथीत प्रांजली पांडूरे व काव्या तुपे यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.