पुणे : महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीत चेक प्रजासत्ताकचा यिरी व्हेसली आणि बेलारूसचा इगोर गेरसिमोव याच्यांत रविवारी (९ फेब्रुवारी) अंतिम लढत रंगणार आहे.
INTO THE FINAL AND HOW! 💥
Jiri Vesely defied all odds and beat Seed no. 2⃣ Ricardas Berankis in the longest match in the history of Tata Open Maharashtra. 😍#TOM2020 #AdvantagePune #ATPTour #TataOpenMaharashtra | @jiri_vesely pic.twitter.com/GflZcesUZQ
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) February 8, 2020
पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत व्हेसलीने लिथुआनियाच्या रिचर्डस बरांकिसवर ६-७(८), ७-६(३), ७-६(७) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत २६ वर्षीय व्हेसली १०७ व्या तर २९ वर्षीय बरांकिस ७३ व्या क्रमांकावर आहे.
EGOR EASES INTO THE FINAL! 🙆🏼
🇧🇾's Egor Gerasimov brings out his 🅰 game just when it matters and registers a straight-sets win in the semis. 👊🏼#TOM2020 #AdvantagePune #ATPTour #TataOpenMaharashtra | @atptour pic.twitter.com/khPQ75xqHR
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) February 8, 2020
दुस-या उपांत्य लढतीत बेलारूसच्या इगोर गेरासिमोवने आॅस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा ७-६(२), ६-४ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. क्रमवारीत इगोर ९० व्या तर जेम्स ९६ व्या क्रमाकांवर आहे.