पॅरिस – रशियाचा अग्रमानांकित टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव याने येथे संपन्न झालेल्या पॅरिस मास्टर्स सिरीज टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हचा 5-7, 6-4, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.
पहिला सेट गमावल्यानंतरही त्याने या सामन्यात जोरदार पुनरागमन करत पुढील दोन्ही सेटसह सामनाही जिंकला. करोनामुळे मार्च महिन्यापासून सर्व स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. युरोपातील करोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील विजयाने मेदवेदेवने यंदाच्या वर्षात पहिलेच विजेतेपद साकार केले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने जागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.