आळंदी – येथील वडमुखवाडीतील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात ग्रामस्थांचे वतीने नवीन श्री विठ्ठल रुख्मिणी, श्रीराम, श्री लक्ष्मण, श्री हनुमान, श्री सीतामाई, श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचे आळंदीतील मठाधिपती विष्णू महाराज केंद्रे शास्त्री यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना हरिनाम गजरात एकादशी दिनी विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली.
याप्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, मृदंगाचार्य व्यंकटेश महाराज फड, अध्यक्ष सुरेश तापकीर, लोकल बोर्ड संचालक शांताराम तापकीर, पंडित महाराज तापकीर, राजाराम महाराज तापकीर, माजी शिक्षणाधिकारी विलास तापकीर, भाऊसाहेब तापकीर, वसंत तापकीर, विणेकरी शंकर गिलबिले, धनंजय तापकीर, ट्रस्टचे पदाधिकारी, भाविक, ग्रामस्थ महिला, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यानिमित्त धार्मिक कार्यक्रमात काकड आरती, मूर्तीची मिरवणूक, हरिपाठ, यज्ञ, होम हवन, कीर्तन सेवा, संगीत भजन सेवा, महाप्रसादाचे वाटप आदी कार्यक्रम झाले.