पुणे – वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या वाहतूक पोलिसास रिक्षा चालकाने मारहाण साथीदारांसह मारहाण केली. याप्रकरणी कोंढवा पोलीसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
रिक्षा चालक ज्ञानेश्वर अशोक ढावरे, सिध्देश्वर अशोक ढावरे अशी अटक आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अनिल कचरे हे कोंढवा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते खडी मशिन चौक येथे वाहतूक नियमन करत असताना ज्ञानेश्वर ढावरे याने विरुध्द दिशेने रिक्षा आणून वाहतूकीस अडथळा आणला.
त्याला रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली असता, त्याने अनिल यांची कॉलर पकडून हुज्जत घातली. यानंतर पुन्हा काही वेळाने तो कुटूंबातील सदस्यांना रिक्षातून घेऊन तेथे आला. तेथे आरोपींनी अनिल यांच्या अंगावर धावून चापट तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.