रशिया -युक्रेन युद्धाचा आज 15वा दिवस आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्त हानी झाली आहे. मात्र रशिया एवढ्यावर थांबला नसून आज युक्रनेमदील एका बालरुग्णालयावर हल्ला केला आहे. बॉम्बवर्षावात रुग्णालय उद्ध्वस्त केले आहे. या हल्ल्यात 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेक महिला आणि मुलं मलब्याखाली अद्यापही अडकलेल्या अवस्थेत आहेत. या हल्ल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
Today, Russia shelled a Childrenʼs hospital and a Maternity hospital in 📍Mariupol.#closeUAskyNOW #StopRussianAggression#Russia pic.twitter.com/tTu7AAGhoD
— MFA of Ukraine 🇺🇦 (@MFA_Ukraine) March 9, 2022
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात दक्षिण पूर्व भागातील मारियुपोल शहरातील एका मॅटर्निटी हॉस्पीटलवरही रशियाकडून बॉम्बवर्षाव करण्यात आला. इथे अनेक नवजात बालकं आणि त्यांच्या मातांवर उपचार सुरू होते. नगर परिषदेच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली गेली आहे.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे. हा हल्ला म्हणजे ‘अत्याचार’ असल्याची तीव्र भावना झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे.