बीड – बीड शहरात पाण्याच्या कुंडामध्ये ऐतिहासिक कंकालेश्वर शिवमंदिर आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त शहर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी याठिकाणी मोठी गर्दी करतात.
कंकालेश्वर मंदिर हे बीड जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची साक्ष आहे. या मंदिरावरून चालुक्य वास्तुकलेचा उत्तम नमुना पहायला मिळतो. दहाव्या व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे.
चालुक्य राज्याच्या काळात स्त्रियाही लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. त्याचे उदाहरण मंदिरावर लढणार्या स्त्रियांचे शिल्पातून पाहायला मिळते. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप असल्याचे दिसून येते. जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराचा आकार स्टार माश्याप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे.