पुणे –गेल्या 24 तासांत करोनाचे 199 बाधित आढळले आहेत, तर चार बाधितांचा मृत्यू झाला. त्यातील एकजण पुणे शहर हद्दीतील आहे.
करोनाचे बाधित आता बऱ्यापैकी कमी होऊ लागले आहेत.
आजपर्यंत 6 लाख 59 हजार 465 बाधित आढळले. त्यातील 6 लाख 48 हजार 180 जण बरे झाले आहेत, त्यात दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या 333 जणांचा समावेश आहे. याशिवाय 9 हजार 338 जणांना जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत सक्रिय बाधितांची संख्या 1,947 असून, 16 बाधित व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय 108 जण ऑक्सिजनवर आहेत, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले आहे.