मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियन प्रकरणी गंभीर आरोपा केले. त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सॅलियन प्रकरण चर्चेत आले आहे. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिल्यानंतर आयोगाने मालवणी पोलिसांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी काही ट्वीट करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत देणारी टीका केली आहे. मात्र या टीकेवर आता रुपली चाकरणकर यांनी उत्तर दिले आहे.
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सॅलियन या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.(1/4) pic.twitter.com/60qtTG4Ij6
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 21, 2022
असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सॅलियन हिची बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सॅलियन यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत,” असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले होते.
Mumbai mayor writes 2 state women commission n then she writes 2 Malvani pol station 2 gv a report abt Disha Salian case..
So a grand cover up is planned 2 show nothing happened on the 8th of June night by the state gov..
Chalo I m glad finally they r digging their own grave!— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022
नितेश राणेंनी या प्रकरणामध्ये मालवणी पोलिसांच्या तपासाबद्दल शंका घेणारी आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं संकेत देणारी ट्विट आज केली. “मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणाऱा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल नितेश राणेंना विचारला आहे.