कामेंग – अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेल्या 7 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्काराकडून घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.
हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीला कामेंग सेक्टरमधील अति उंच भागात हिमस्खरन झाले होते. यामध्ये काही भारतीय जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
त्यानंतर लष्कराकडून शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. अखेर दोन दिवसांनी ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत सात भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे.