कोल्हापूर – मुंबईहून स्क्रॅपसाठी आणलेली स्पोर्ट्स मोटारसायकल चोरीची असून गुन्हा दाखल करण्याची भिती घालून वकीलाच्या मुलाकडून दहा लाखांची लाच स्विकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा कॉन्स्टेबलना रंगेहात पकडले.
संशयित विजय केरबा कारंडे (४६, रा. उचगाव, ता. करवीर), किरण धोंडीराम गावडे (३७, रा. केदारनगर, मोरेवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. लाचलचुपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. शुक्रवारी भर दूपारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात घडलेल्या लाच प्रकारणाने खळबळ उडाली आहे.