बॉलिवूड व टॉलिवूड मधील अनेक कलाकर सद्या सोबत काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येत आहेत तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील कलाकार देखील बॉलिवूडमध्ये काम करताना दिसून येत आहे. याआधी अभिनेता प्रभासने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. त्यानंतर आता लवकरच आणखी काही दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत.
विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडा हा दाक्षिणात्य सिनेमामधील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे. विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तो लायगर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा सोबत अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार आहे. या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
समंथा
अभिनेत्री समंथा टॉलिवूड मधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. समंथाही बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावू पाहत आहे. अभिनेत्रीने याआधी द फॅमिली मॅन या हिंदी वेबसीरीजमध्ये काम केले आहे. दरम्यान लवकरच आता ती एका हिंदी चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात समंथा आणि अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असणार आहे.
रश्मिका मंदाना
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाचे देशभरात चाहते आहेत. याशिवाय नॅशनल क्रश म्हणून अभिनेत्रीला सर्वांनी पसंती दिली आहे. रश्मिका लवकरच बॉलिवूड चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रश्मिका सिद्धार्थ मल्होत्राच्या मिशन मजनब या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या गुडबाय या चित्रपटामध्ये देखील रश्मिका काम करणार आहे.
नागा चैतन्या
अभिनेता नागा चैतन्य हा बॉलिवूडच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये काम करणार आहे. या चित्रपटात तो बाला नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.